कारागिराकडून सव्वा कोटीच्या सोन्याचा अपहार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पुणे - दागिने बनविण्यासाठी दिलेल्या एक कोटी २१ लाख रुपयांच्या सोन्याचा कारागिरानेच अपहार केला. याप्रकरणी मुंबईतील सुवर्ण कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे - दागिने बनविण्यासाठी दिलेल्या एक कोटी २१ लाख रुपयांच्या सोन्याचा कारागिरानेच अपहार केला. याप्रकरणी मुंबईतील सुवर्ण कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी स्वप्नील कोठारी (वय ४२, रा. वेलणकर कॉलनी, पर्वती) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राकेश खेतमल मेहता (रा. भुलेश्‍वर, चंपा गल्ली, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोठारी यांचा सुवर्णालंकार बनवून देण्याचा व्यवसाय आहे. शहरातील सराफी व्यावसायिक त्यांच्याकडे दागिने घडविण्यासाठी देतात. सबकॉन्ट्रॅक्‍टर मेहता याच्याकडे ते दागिने बनविण्याचे काम देतात. त्यानुसार एप्रिल महिन्यात कोठारी यांनी त्यांच्याकडील एक कोटी २१ लाख रुपयांचे सोन्याचे लगड व तुकडे मेहताकडे दिले. तसेच, त्यास एक लाख ४६ हजार २०० रुपये रोख रक्कमही दिली होती; परंतु दिलेल्या मुदतीत मेहताने दागिने दिले नाहीत. तसेच, कोठारी यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी मेहताविरुद्ध फिर्याद दाखल केली. 
या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजित डफळ करत आहेत.

Web Title: 1.25 crore rupees gold appropriation by worker crime