ऊस उत्पादकांना साडेबारा हजार कोटी

अनिल सावळे
रविवार, 24 मे 2020

यंदा एकही आरआरसी नाही
मागील हंगामात शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांविरुद्ध साखर आयुक्तालयाकडून आरआरसीची (वसुली प्रमाणपत्र) कारवाई करावी लागली होती. परंतु यंदा कारखान्यांनी एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना दिल्यामुळे तशी एकही कारवाई करावी लागली नाही.

पुणे - यंदाच्या गाळप हंगामात राज्यातील ऊस उत्पादकांना एफआरपीपोटी सुमारे १३ हजार १२१ कोटी रुपये देय असून, त्यापैकी साडेबारा हजार कोटी रुपये मिळाले आहेत. एफआरपीची ९५ टक्के रक्कम दिली असून, उर्वरित पाच टक्के म्हणजे सुमारे सहाशे कोटी रुपये साखर कारखानदारांकडे थकीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात गतवर्षी सहकारी आणि खासगी अशा १९५ साखर कारखान्यांनी सुमारे ९५२ लाख टन उसाचे गाळप केले होते. यावर्षी ७९ सहकारी आणि ६७ खासगी अशा १४६ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. त्यांनी सुमारे ५५० लाख टन उसाचे गाळप केले. 

पालखी मार्ग, मेट्रोच्या भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लागणार; जिल्हाधिकारी म्हणाले...

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ४०० लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. परिणामी उलाढालीत तुलनेत नऊ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न कमी झाले आहे. ऊस उत्पादकांना गतवर्षी एफआरपीपोटी २२ हजार १७२ कोटी रुपये रक्कम देय होती. या तुलनेत यंदा १३ हजार १२१ कोटी रुपये देय आहेत.

क्षेत्र घटले, उत्पन्नही घटले
गेल्या हंगामात शेतकऱ्यांना एफआरपीपोटी सुमारे २२ हजार कोटी रुपये मिळाले होते. उसाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे गाळपातही घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही गतवर्षीच्या तुलनेत तब्बल नऊ हजार कोटींची घट झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12.5 crore ruppess to sugarcane production