पालखी मार्ग, मेट्रोच्या भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लागणार; जिल्हाधिकारी म्हणाले...

Pune_Metro_Construction
Pune_Metro_Construction

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बंद पडलेली भूसंपादनाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे पालखी मार्ग, मेट्रोच्या भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लागणार आहेत. तसेच, भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांना भरपाई रक्कम मिळण्यास मदत होणार आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शनिवारी (ता.२३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यात विकासाची कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. भूसंपादन, मनरेगा आणि शेतीविषयक कामे सुरू आहेत. मनरेगाच्या कामावर चार हजार मजूर कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना खते, बियाणांचा पुरवठा व्हावा, यासाठी मार्केटयार्डमधील दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने सोडवू 
चाकण, रांजणगावसह जिल्ह्यातील उद्योगांना परवानगी देण्यात आलेली आहे. उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने सोडवण्यात येतील, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

देशांतर्गत विमान प्रवाशांची तपासणी नाही 
देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रवासापूर्वीच आरोग्य तपासणी होणार आहे. त्यामुळे पुन्हा प्रवासानंतर आरोग्य तपासणी करण्यात येणार नाही. मात्र, या प्रवाशांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक राहणार आहे. रेड झोनमधून विमानतळावर प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना परवानगी देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.

एफसी रोड बंद नाही 
एफसी रोड रविवारी बंद करण्यात येणार नाही. याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com