पुण्यात 13 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; नांदेड फाटा परिसरातील धक्कादायक घटना

निलेश बोरुडे
Monday, 4 January 2021

आरोपी बाबासाहेब थोरे याने खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून मुलावर लैंगिक अत्याचार केले.

किरकटवाडी (पुणे) : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरातील एका 13 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एका 25 वर्षीय नराधमास हवेली पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video: 'हाफ चड्डी घालून नागपूरात खोटी भाषणं करणं हा राष्ट्रवाद नाही'; सचिन पायलट यांनी डागली तोफ

बाबासाहेब उर्फ पप्पू कालिदास थोरे (वय 25,रा. संजीवनी हॉटेल समोर, जगताप चाळ, नांदेड फाटा, नांदेड,ता.हवेली जि.पुणे, मूळ राहणार ता.औसा, लातूर.) असे अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास पीडित मुलगा त्याच्या घराजवळ त्याची आई कामावरून घरी परत येण्याची वाट पाहत होता. त्यावेळी आरोपी बाबासाहेब थोरे याने मुलाला गप्पा मारण्याच्या बहाण्याने कोणीही राहण्यास नसलेल्या एका इमारतीच्या खोलीमध्ये नेले. तेथे आरोपी बाबासाहेब थोरे याने खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून मुलावर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे आरोपी बाबासाहेब थोरे हा पीडित मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांच्या परिचयाचा आहे.

मन हेलावून टाकणारी घटना! पिंपरीत कुत्र्याला पोत्यात टाकून जाळले

घडलेला प्रकार घाबरलेल्या मुलाने कामावरून परतलेल्या त्याच्या आईला सांगितला. त्यानंतर सोमवारी (ता.4) सकाळी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. हवेली पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत काही तासांतच आरोपीला अटक केली. हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नम हे या बाबत अधिक तपास करत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 year old boy has been sexually assaulted in Pune city one arrest