

“Pimparkhed villagers express anger after 13-year-old Rohan’s death in leopard attack; cremation held 42 hours later.”
Sakal
-संजय बारहाते
टाकळी हाजी : रविवारी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रोहन विलास बोंबे (वय १३, पिंपरखेड) ता शिरूर या चिमुकल्या विद्यार्थ्यावर तब्बल ४२ तासांनंतर मंगळवारी पिंपरखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी परिसरातील नागरिक, नातेवाईक आणि शाळकरी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती. परिसरात शोककळा पसरली होती.