कारमधून नेत होते १३० किलो गांजा; तस्करी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे (पश्‍चिम) अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी सायंकाळी शहरात गस्त घालत होते.

पुणे : कारमधून गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थविरोधी पथकाने पाठलाग करुन बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 130 किलो गांजा, कार आणि रोख रक्कम असा 24 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (ता.17) सायंकाळी येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात करण्यात आली. 

अरुण बळीराम जाधव (वय 26, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, निगडी), प्रशांत हरिभाऊ शिंदे (वय 25, निगडी) आणि शुभम सुनील मोहिते (वय 19, रा. पांगरी, खेड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अजब पोलिसांची गजब कारवाई; नाश्‍ता करणाऱ्या विद्यार्थीनींकडून विनापावती केली दंडवसुली​

खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाचे (पश्‍चिम) अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी सायंकाळी शहरात गस्त घालत होते. त्यावेळी एका कारमधून गांजाची तस्करी केली जात असून संबंधीत कार गुरुवारी सायंकाळी येरवडा परिसरात येणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक दत्ताजी मोहिते, निलेश महाडिक, पोलिस कर्मचारी प्रदीप गाडे, रमेश गरुड, मंगेश पवार, सुनील चिखले, महेश कदम, विजय गुरव, साहिल शेख, प्रदीप शितोळे, फिरोज बागवान यांच्या पथकाने येरवड्यातील शास्त्रीनगर चौकामध्ये सापळा लावून अटक केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 130 kg of cannabis seized from three smugglers by Pune police