esakal | तेरा हजार रेमडेसिव्हिर पुण्यामध्ये वितरित

बोलून बातमी शोधा

Remdesivir
तेरा हजार रेमडेसिव्हिर पुण्यामध्ये वितरित
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यातील ८२८ रुग्णालयांना गेल्या दोन दिवसांमध्ये १३ हजार २५७ रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या वायल्स पुरविण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिली.

रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून बहुतांश सर्व रुग्णांना हे इंजेक्शन डॉक्टर लिहून देत होते. या इंजेक्शनच्या पुरवठ्यापेक्षा मागणी अनेक पटींना वाढली. या पार्श्वभूमिवर रेमडेसिव्हिर इंजेक्शन वितरणाची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली.

हेही वाचा: पुण्यात सलग चौथ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

या बाबत पाटील म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ८२८ रुग्णलयांमधील २१ हजार ७८१ खाटांवर रुग्णांना उपचार देण्यात येत होते. त्यापैकी बुधवारी सहा हजार ८५७ आणि गुरुवारी सहा ४०० अशा प्रकारे १३ हजार २५७ इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.”

पुणे जिल्ह्यात शुक्रवारपासून या इंजेक्शनचा उपलब्ध साठा रोजच्या रोज रुग्णालयांपर्यंत पोचविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहे. या इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी शहरी भागात सहा व ग्रामीण भागात १२ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे.