Pune Fraud: 'उदापूर येथील एकाची साडे तेरा लाखांची फसवणूक';स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष, महिलेने घातला गंडा
₹13.5 Lakh Housing Scam in Udaipur: मंडलिक यांनी वेळोवेळी आरटीजीएस व फोन पेद्वारे एकूण १३ लाख ५७ हजार २०० रुपये सराईकर हिच्या खात्यावर पाठवले. मात्र घराचा ताबा काही त्यांना मिळाला नाही. त्यानंतर आरोपीने पैसे परत करते म्हणून दिलेला चेकही बाउन्स झाला.याबाबत मंडलिक यांनी ओतूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
ओतूर : उदापूर (ता.जुन्नर) येथील एकाची एमएमआरडीएमध्ये स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने साडे तेरा लाखांची फसवणूक केल्या बाबत ओतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.