चौदा पोलिस निरीक्षकांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

पुणे - नव्याने होणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी 14 पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत गृह विभागाने शुक्रवारी आदेश काढला. यात मुंबई शहर पोलिस दलातील अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे.

पुणे - नव्याने होणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी 14 पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत गृह विभागाने शुक्रवारी आदेश काढला. यात मुंबई शहर पोलिस दलातील अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे.

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानंतर या कामाला गती मिळाली आहे. आयुक्तालयासाठी जागा शोधण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच गृह विभागाने पोलिस निरीक्षकांच्या नियुक्तीचा आदेश काढला आहे. आस्थापना विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी हा आदेश काढला आहे.

मुंबई शहरातून पाच, कोल्हापूरमधून दोन, नगर व रायगडमधून प्रत्येकी एक, गुन्हे अन्वेषण विभागातील दोन आणि पुणे शहर, राज्य गुप्तवार्ता विभाग व पोलिस प्रशिक्षण केंद्र येथील प्रत्येकी एक, अशा एकूण चौदा पोलिस निरीक्षकांची या आयुक्तालयामध्ये बदली केली आहे.

कार्यमुक्तीसाठी स्वतंत्र आदेश
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेबाबत अद्याप शासन निर्णय निघालेला नाही. त्यामुळे या आयुक्तालयासाठी बदली करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांना सध्या कार्यमुक्त करू नये. त्यांना कार्यमुक्त करण्याबाबत स्वतंत्रपणे आदेश देण्यात येणार असल्याचे राजकुमार व्हटकर यांनी आदेशामध्ये स्पष्ट केले आहे.

नियुक्त केलेले पोलिस निरीक्षक -
राजेंद्र निकाळजे, भानुदास जाधव, दिलीप भोसले, सुनील दहिफळे, प्रदीप लोंढे (सर्व मुंबई शहर), यशवंत गवारी, सतीश पवार (कोल्हापूर), पांडुरंग गोफणे (रायगड), सुनील पवार (अहमदनगर), सुधाकर काटे, टी. वाय. मुजावर (गुन्हे अन्वेषण विभाग), श्रीराम पौळ (राज्य गुप्तवार्ता विभाग), अजय जोगदंड (पोलिस प्रशिक्षण केंद्र, दौंड) संजय निकम (पुणे शहर).

Web Title: 14 Police inspector Appointment