पुण्यात २६ दिवसांत १४६ मिलिमीटर पाउस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पुणे - पुण्यात २६ दिवसांत १४६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा २६.२ मिलिमीटर पाऊस जास्त पडला असल्याची माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली. पुढील चार दिवसांत हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या एक-दोन सरी पडतील, अशी शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत चार मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे सहा मिलिमीटर पाऊस पडला. पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून आकाश ढगाळ होते. दुपारी बारापासून पावसाला सुरवात झाली.

पुणे - पुण्यात २६ दिवसांत १४६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीपेक्षा २६.२ मिलिमीटर पाऊस जास्त पडला असल्याची माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली. पुढील चार दिवसांत हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या एक-दोन सरी पडतील, अशी शक्‍यताही वर्तविण्यात आली आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत चार मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे सहा मिलिमीटर पाऊस पडला. पुण्यात आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून आकाश ढगाळ होते. दुपारी बारापासून पावसाला सुरवात झाली. कोथरूड, सिंहगड रस्ता, कात्रज, धनकवडी, पाषाण, शिवाजीनगर, नगर रस्ता, बाणेर, बालेवाडी या उपनगरांसह शहरातील मध्य वस्तीतील पेठांमध्ये पावसाचा जोर मोठा होता. तासभर पडलेल्या पावसाने दुपारी विश्रांती घेतली. संध्याकाळनंतर परत पावसाच्या हलक्‍या सरी पडू लागल्या. रात्री उशिरापर्यंत या सरी पडत होत्या. 

हवेतील आर्द्रता वाढल्याने कमाल तापमानाचा पारा २८.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा १.१ अंश सेल्सिअसने हे तापमान कमी झाले होते. किमान तापमानही २१.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पाऊस हजेरी लावेल. दिवसभरात एक-दोन सरी पडतील, अशी ५१ ते ७५ टक्के शक्‍यता असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

Web Title: 146 mm rain in pune