Video : जपानी पाहुण्यांनी पु.ल. देशपांडे बागेच्या वाढदिवसाला लावली हजेरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

सिंहगड रस्ता परिसरातील पु. ल. देशपांडे उद्यान अर्थात ओकायामा मैत्री उद्यानाचा 14 वाढदिवस जपानी पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

सिंहगड रस्ता (पुणे) : "पुणे-ओकायामा मैत्री' ही केवळ या दोन शहरांपुरता न राहता भारत-जपान मैत्रीचे प्रतीक म्हणून बघितले जाईल. ही मैत्री नेहमी अखंड राहो. या उद्यानाचे खरे श्रेय येथील कर्मचाऱ्यांना आणि पुणेकरांना आहे, असे मत जपानच्या ओकायामा शहर काउन्सिलचे अध्यक्ष मासाहिको उराकामी यांनी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिंहगड रस्ता परिसरातील पु. ल. देशपांडे उद्यान अर्थात ओकायामा मैत्री उद्यानाचा 14 वाढदिवस जपानी पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमास जपानचे प्रतिनिधी वाके ताकेशी, फुकुयोशी तोमोनारी, हायाशी तोशीहीरो, मोरियम कोजी, ओकाझी ताकाशी, शिओमी किमियो, उएदा मासाताका, मुंबईमधील जपानी वकीलातीचे प्रमुख मिचीओ हारादा, असोसिएशन ऑफ जपान, पुणेचे अध्यक्ष समीर खळे, उपाध्यक्ष अमित आंबेडकर, सचिव आमोद देव, समन्वयक जयश्री भोपटकर, भाषांतरकार आणि इंडो जापान बिझिनेस काउन्सिलचे अध्यक्ष श्रीकांत अत्रे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका अनिता कदम, नगरसेवक आनंद रिठे, उद्यानप्रमुख अशोक घोरपडे, माजी उद्यानप्रमुख यशवंत खैरे, संतोष तांदळे, उद्यान अधीक्षक संतोष कांबळे, उद्यान निरीक्षक सर्जेराव काळे, कनिष्ठ अभियंता अपर्णा जाधव, आदी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : 'सेट'चा अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणेकरांना जसे आम्ही आवडतो, तसे पुणेकरदेखील आम्हाला खूप आवडतात. हीच खरी मैत्री आहे. पुणेकरांशी झालेली सहज मैत्री आनंददायी आहे. पुणेकर या उद्यानाचा आनंद घेतात हे पाहून मन खूपच आनंदी झाले. काउन्सिलर म्हणून आम्ही तेथील नागरिकांसाठी काम करतो; पण आता आम्ही पुणेकरांसाठीदेखील काम करू, असे आश्‍वासनदेखील जपानी पाहुण्यांनी दिले. 

जपानी बाहुल्यांचे आणि बोन्सायचे प्रदर्शनदेखील भरविण्यात आले होते. पुण्यात जपानी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले. त्यास जपानी पाहुण्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. 

उद्यानात आता जपानी भाषेत फलक 
उद्यानात विविध फलक लावले आहेत. हे फलक जपानी भाषेतदेखील लावावेत; जेणे करून जपानी पाहुणे आल्यावर त्यांनादेखील ते वाचता येतील, अशी मागणी जपानी पाहुण्यांनी केल्यावर उपमहापौर शेंडगे यांनी लवकरच तसे फलक लावणार असल्याचे आश्‍वासन दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14th foundation day of Okayama Maitri garden