म्हाडा कॉलनीजवळ 15 कुत्रे आढळले मृत अवस्थेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

पुणे : पुण्यातील हडपसर भागात 15 कुत्रे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अचानक अशा कुत्र्यांचा इतक्या संख्येने मृत्यू झाल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेची माहिती शनिवारी हडपसरच्या रहिवाशांना समजली.

काल म्हाडा कॉलनीजवळ 15 कुत्रे मृत अवस्थेत सर्व कुत्रे आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी माहिती ताबडतोब हडपसर पोलिसांना दिली. सर्व मृत कुत्रे पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. रस्त्यावरील एवढ्या मोठ्या संख्येत कुत्रे एकत्र मरण पावले याअर्थी त्यांच्या मृत्यू हा नैसर्गिक नसून कोणी तरी मारल्यामुळे झाला अशी शंका नागरिकांच्या मते वर्तविली जात आहे. 

Web Title: 15 dogs dead near MHADA colony