Flood alert in Maharashtra: Katkari tribals shifted to safe shelters after Meena river overflows.

Flood alert in Maharashtra: Katkari tribals shifted to safe shelters after Meena river overflows.

Sakal

Meena River flood: 'मीना नदीने पूराची धोक्याची पातळी आेलांडली'; कातकरी आदिवासी समाजातील 15 नागरिक सुरक्षित स्थळी हलवले

Meena River Crosses Danger Mark: वडज धरण पाणलोट क्षेत्रात नव्वद मिलिमीटर पाऊस झाला आहे. वडज धरण 100 टक्के भरले आहे. पूर नियंत्रणासाठी वडज धरणातून बारा हजार क्यू सेक्स पाणी सोडल्याने मीना नदीला पूर आला आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे.
Published on

-रवींद्र पाटे

नारायणगाव : मीना नदीला पूर आला असून नदीतून धोक्याच्या पातळीवरून पाणी वाहत आहे. वारुळवाडी येथे मीना नदीच्या काठावर झोपड्या बांधून राहणाऱ्या कातकरी आदिवासी समाजातील पाच कुटुंबातील पंधरा नागरिकांना नारायणगाव पोलिसांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवल्याने मोठी दुर्घटना टळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com