Pune News : आदर्श शाळांसाठी आणखी १५ शाळांचा प्रस्ताव

पुणे महापालिकेच्या शाळा सर्व सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी आदर्श शाळा योजना राबविली जात आहे. यंदाच्या वर्षी ३० शाळांचा या योजनेत समावेश केला.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal

पुणे - पुणे महापालिकेच्या शाळा सर्व सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी आदर्श शाळा योजना राबविली जात आहे. यंदाच्या वर्षी ३० शाळांचा या योजनेत समावेश केला. यातील १५ शाळांचे काम पूर्ण होत आले आहे. तर १५ शाळांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आगामी २०२४-२५ या वर्षासाठी आणखी १५ शाळांसाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पुणे महापालिकेच्या मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड माध्यमाच्या २८४ शाळा असून, सुमारे ९० हजार विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आपुलकी वाटावी यादृष्टीने शाळांचे सुशोभीकरण व गुणवत्ता वाढीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी १५ शाळांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली. दिल्ली, पिंपरी चिंचवड यासह इतर शहरातील महापालिकेच्या शाळांच्या धर्तीवर पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये बदल केला जाणार आहे. यासाठी काही सामाजिक संस्थांचे सहकार्य घेतले जात आहे.

आदर्श शाळांमध्ये पहिल्या टप्प्यात १५ शाळांची निवड करण्यात आली. या शाळांमधील बहुतांश कामे पूर्ण झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात १५ शाळांमधील कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यास लवकरच मान्यता देऊन काम सुरु केले जाईल.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ‘महापालिकेच्या यंदा ३० शाळांमध्ये आदर्श शाळा ही योजना राबविण्यात आली. २०२५ च्या शैक्षणिक वर्षापासून या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. आणखी १५ शाळा याच पद्धतीने तयार केल्या जाणार असून, आगामी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com