Pune : बांधकामासाठी वापरले प्रक्रिया केलेले १५ हजार टँकर पाणी

पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे
15 thousand tankers of waste water used for construction pune
15 thousand tankers of waste water used for construction punesakal

पुणे : पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाण्याचा वापर जपून करण्याचे सूचना दिलेल्या असताना पाणी पुरवठा विभागाकडून बांधकाम व्यावसायिकांना सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

गेल्या १० महिन्यात १५ हजार २७३ टँकर पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्नन आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

यंदाच्या मॉन्सूनच्या प्रवासात एल निनोचा प्रभाव असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी असल्याची शक्यता आहे. खडकवासला धरण प्रकल्पातील पाणी साठा झपाट्याने कमी होत असून,

उपलब्ध पाणी पुणे शहरासह इतर गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी उपलब्ध करून देताना तारेवरची करसत होणार आहे. त्याताच पाऊस वेळवर पडला नाही तर तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी महापालिकेने उपाय योजना कराव्यात अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

महापालिकेने बांधकाम आणि वॉशिंग सेंटरसाठी पिण्याचे पाणी वापरत असल्याबाबतचा तक्रारी आल्याने एरंडवणे, डीपी रस्ता या भागात २५ ठिकाणी कारवाई केली आहे. शहराच्या इतर भागातही अशी कारवाई केली जाणार आहे. तसचे महापालिकेचे शहरात विवध ठिकाणी सांडपाणी शुद्धिकरण केंद्र आहेत. तेथे शुद्ध केलेले पाणी बांधकामाला वापरावे,

पिण्याचे पाणी वापरू नये असे आदेश महापालिकेने काढले होते. त्यानुसार गेल्या १० महिन्यात बांधकामांसाठी एसटीपीवरून १५ हजार २७३ टँकर पाणी नेण्यात आले असून, १५ कोटी २७ लिटर पाण्याचा वापर करण्यात आला आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com