पुण्यात मंगळवारी दिवसभरात १५८ नवे कोरोना रुग्ण

पुणे शहरात मंगळवारी (ता. २८) दिवसभरात १५८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
Corona patients
Corona patientssakal media

पुणे - पुणे शहरात मंगळवारी (ता. २८) दिवसभरात १५८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट १७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

सद्यःस्थितीत पुणे शहरातील ६८५ कोरोना रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून ७११ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात एकूण ६३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसांतील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील १५८ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १०९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २८९, नगरपालिका हद्दीतील ५८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २० रुग्ण आहेत.

आज दिवसभरात जिल्ह्यातील ७०४ जणांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. यामध्ये पुणे शहरातील १७२ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १००, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३६०, नगरपालिका हद्दीतील ६३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील नऊ जणांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com