नेटबँकिंगद्वारे लोन काढून 16 लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

सिमकार्ड अपग्रेड करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगाराने कोथरूड मधील एका व्यक्तीच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरली. तसेच त्याद्वारे नवीन नंबर बदलून घेत नेट बँकिंगद्वारे बँक खात्यावरील एक लाख 80 हजार रुपये काढून घेतले आणि खाजगी बँकेतून 16 लाख 45 हजार रुपयांचे कर्ज उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - सिमकार्ड अपग्रेड करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगाराने कोथरूड मधील एका व्यक्तीच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरली. तसेच त्याद्वारे नवीन नंबर बदलून घेत नेट बँकिंगद्वारे बँक खात्यावरील एक लाख 80 हजार रुपये काढून घेतले आणि खाजगी बँकेतून 16 लाख 45 हजार रुपयांचे कर्ज उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सचिन कुलकर्णी (वय 45, रा. कोथरूड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीना 6 मे रोजी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने सिमकार्ड थ्रीजी मधून फोरजी मध्ये अपग्रेड करून घ्यायचे आहे का? अशी विचारणा केली. त्याला फिर्यादीनी प्रतिसाद देत मोबाईल क्रमांक बदलायचा असल्याप्रकरणी संबंधित कंपनी मेसेज पाठविला.  त्यानंतर चोरट्याने फिर्यादीच्या मोबाइलवर एक मेसेज पाठऊन येस हा पर्याय निवडून मोबाइल बंद ठेवण्यास सांगितले. 

पुणे शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात; बाधितांचे घरातच विलगीकरण

फिर्यादीने येस हा पर्याय निवडताच मोबाईल मधील सर्व माहिती चोरत्यांनी चोरून घेतली. त्यानंतर सिम कार्ड क्रमांक बदलून नेट बँकिंग द्वारे एक लाख 80 हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी आरोपीने फिर्यादीच्या बँक खात्यावरून 16 लाख 45 हजार रुपयांचे कर्ज उचलले आणि ती रक्कमही बँक खात्यातून काढून घेतली. अशाप्रकारे  सायबर गुन्हेगारांनी फिर्यादीची एकूण 18 लाख 25 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. लॉकडाऊन असल्याने फिर्यादीना हा प्रकार लवकर निदर्शनास आला नाही. दरम्यान, त्यांनी  बँक खाते तपासून पाहिल्यानंतर त्याना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. 

पावसाळ्यात ज्येष्ठ, गर्भवती, मुलांची काळजी घ्या; फ्ल्यूबरोबरच कोरोनाची धास्ती

इन्स्टंट पर्सनल लोन काढले -
सायबर गुन्हेगारांनी मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरून हा गुन्हा केला आहे. याप्रकरणी बँक आधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी नेट बँकिंगद्वारे इन्स्टंट पर्सनल लोन ग्राहकाला देत असल्याचे सांगितले.  या गुन्ह्याचा तांत्रिक अंगाने तपास केला जात आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 lakh rupees cheating by taking a loan through netbanking