संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात 16 जण कोविड पॉझिटीव्ह

काल बारामती शहरामध्ये केलेल्या तपासणीमध्ये चार जण पॉझिटिव्ह निघाले होते.
Corona Test
Corona Testsakal
Summary

काल बारामती शहरामध्ये केलेल्या तपासणीमध्ये चार जण पॉझिटिव्ह निघाले होते.

बारामती - श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील आज केलेल्या कोविडच्या रॅपिड एंटीजन टेस्ट मध्ये एकाच दिवशी बारा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे आता प्रशासनाला काळजी वाटू लागली आहे. या पैकी एकही जण बारामती परिसरातील नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान काल बारामती शहरामध्ये केलेल्या तपासणीमध्ये चार जण पॉझिटिव्ह निघाले होते. यापैकी कोणालाही गंभीर स्वरूपाची लक्षणे नसली तरीही चाचण्या पॉझिटिव्ह येत असल्यामुळे सर्वांनी कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने उंडवडी येथे घेतलेल्या तपासणीमध्ये एकही जण कोविड पॉझिटिव्ह आढळला नव्हता, मात्र बारामतीत चार तर काटेवाडी मध्ये 12 जण पॉझिटिव्ह आल्यामुळे काहीशी काळजी करण्यासारखी परिस्थिती असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

आज उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये दिंडी प्रमुखांना बाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान ज्या वारकऱ्यांना कोविड निष्पन्न झाला आहे त्यापैकी काहींनी तपासणी झाल्यानंतर आपले मोबाईल स्विच ऑफ केलेले आहेत, तर काहीजण गावाकडे निघून गेले आहेत. प्रशासनाच्या वतीने दिंडी प्रमुखांना कोविडबाधित वारकऱ्यांना दिंडीत सहभागी करून न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गर्दी जास्त असल्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान यंदा पालखी सोहळ्यामध्ये काही वारकऱ्यांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दरम्यान, बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय व रुई ग्रामीण रुग्णालयात स्वॅब तपासणी सुरु असून लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करावी असे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com