लोणावळ्यात १७ कोटींची कामे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

लोणावळा - लोणावळा नगर परिषद हद्दीत १७ कोटी रुपयांच्या विकासकामांसह सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चून नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलांच्या कामांना मुहूर्त मिळणार आहे. 

प्रिछली हिल, तुंगार्ली येथे इंदिरानगर उद्यानाकडे जाताना, कैलासनगर ते मॉन्सून लेक दरम्यान नौसेना बाग येथे, वळवण-नांगरगाव रस्त्यावर अनंत तरे यांच्या बंगल्याजवळ तसेच तुंगार्ली येथील आर.सी.वाला बंगल्याजवळ जुना पूल पाडून त्याजागी नवीन पुलाच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी दिली. 

लोणावळा नगर परिषद हद्दीतील प्रस्तावित मंजूर विकासकामांसंदर्भात सुरेखा जाधव व पुजारी यांनी गुरुवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत माहिती दिली. याचबरोबर भांगरवाडी रेल्वे उड्डाण पुलाच्या बाबतीत काही त्रुटी असून, दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामास सुरवात होईल, असा विश्‍वास श्रीमती जाधव यांनी व्यक्त केला. १ कोटी ५३ लाख रुपये खर्चून व्हीपीएस विद्यालयाजवळ संरक्षक भिंत बांधण्याबरोबर शहरात प्रवेश करताना कुमार रिसॉर्टजवळ सुमारे अकरा कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा रेल्वे उड्डाण पुलाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सुरेखा जाधव श्रीधर पुजारी यांनी दिली.

मंजूर विकासकामे
 नगर परिषद हद्दीतील तुंगाली प्रभागातील लालको चौक ते इंदिरा गांधी उद्यान रस्त्याचे डांबरीकरण करणे ः २ कोटी २६ लाख ७६ हजार रुपये
 खंडाळ्यातील हिलटॉप कॉलनी रस्ता ः २ कोटी १० लाख ४५ हजार रुपये
 नांगरगाव येथे अग्निशमन केंद्र बांधणे ः १ कोटी ८० लाख ४२ हजार रुपये.
 कैलासनगर स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविणे ः ७४ लाख ३६ हजार रुपये
 गवळीवाडा क्रीडांगण विकास आराखडा विकसित करणे ः १ कोटी २४ लाख ७५ हजार रुपये
 वळवण जकात नाका ते नांगरगाव रस्ता डांबरीकरण ः १ कोटी ९७ लाख ४७ हजार रुपये
 आर्शीवाद हॉस्पिटल समोर शॉपिंग सेंटर बांधणे ः २ कोटी ४९ लाख रुपये

Web Title: 17 crore rupees work in lonavala