Pune News : सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यात जन्मदात्या बापाकडून मुलीचा विनयभंग; १२वीचं हॉल तिकीटही फाडलं

प्रातिनिधीक फोटो
प्रातिनिधीक फोटोesakal

पुणे : सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुण्यात जन्मदात्या पित्याकडूनच १७ वर्षीय मुलीचा पाच वर्षांपासून विनयभंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडिलांसह सावत्र आईकडून देखील पिडीत तरुणीचा पाच वर्षांपासून छळ केला जात होता.

अखेर पिडीत तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आई वडिलांच्या विरोधात केला गुन्हा दाखल केला असून सागर पवार (३८) आणि उज्वला पवार (३५) असे आरोपींचे नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही तिच्या वडिल आणि सावत्र आईसह येरवडा भागात वास्तव्यास आहे. वयाच्या अवघ्या पाच वर्षाची असताना पिडीत तरुणीची आईचे निधन झाले होते. त्यानंतर वडीलजे भाजी विक्रेते आहेत, त्यांनी दुसरे लग्न केले होते. २०१८ पासून आई वडिलांनी मिळून अनेक वेळा या तरुणीचा विनयभंग केला. दोघांनी मिळून तिचा अनेक वेळा मानसिक छळ देखील केला.

हेही वाचा - झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

प्रातिनिधीक फोटो
Video : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठेवलं डोकं, जोडले हात, फिरले माघारी; भास्कर जाधवांनी सांगितलं कारण

१२वी बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकीट फाडले...

या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, वडिलांनी तिच्यावर बलात्कार करायचा सुद्धा प्रयत्न केला होता. पण तरी सुद्धा तिच्या आईने अनेक वेळा पतीचीच बाजू घेतली. १२वीच्या बोर्डाचा परीक्षेला जाताना एके दिवशी तिच्या वडिलांनी तिचे हॉल तिकीट फाडले. हताश झालेल्या या तरुणीने हा सगळा प्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला आणि त्यानंतर त्या दोघींनी पोलिस ठाणे गाठले.

पोलिसांनी त्या दोघांवर विनयभंगचा गुन्हा दाखल केला असून वडील सागर पवारला अटक केली आहा. आरोपींवर भारतीय दंडात्मक कलम अन्वये कलम ३५४, ३२४, ५०४ यासह पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तापस सुरू आहे

प्रातिनिधीक फोटो
IND vs PAK Cricket : भारत-पाकिस्तान क्रिकेट पुन्हा सुरू करण्याबाबत आफ्रिदीचं मोठं विधान; म्हणाला, PM मोदींना…

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com