जुन्नर तालुक्यातील 175 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 

दत्ता म्हसकर
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

जुन्नर- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जुन्नर तालुक्यातील १७५ विद्यार्थी पात्र ठरले असल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे यांनी दिली.

जुन्नर- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जुन्नर तालुक्यातील १७५ विद्यार्थी पात्र ठरले असल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी पांडुरंग मेमाणे यांनी दिली.

पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तालुक्यातील 157 शाळांतील 2649 विद्यार्थी बसले होते. यापैकी 758 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 52 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.यात जिल्हा परिषदेच्या आळेफाटा, हिवरे, खामगाव, नगदवाडी  या चार शाळेतील 12 मुलांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या 76 शाळातील 1241 विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी 253 उत्तीर्ण झाले तर 12 शिष्यवृत्ती साठी पात्र झाले. ते पुढील प्रमाणे :- 

आळेफाटा - मधुर शिंदे, संचिता शेळके, भार्गव दाभाडे, अनुष्का भुजबळ, हेमंत गडगे, भाग्यश्री गडगे, तनुजा थोरात, भक्ती शिंदे एकूण आठ विद्यार्थी, हिवरे शाळा- सिद्धेश खोकराळे, ओम भोर,खामगाव शाळा - रुपाली ढोबळे, नगदवाडी शाळा - आर्यन सोनवणे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) परीक्षेसाठी 98 शाळांतील 1670 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 326 उत्तीर्ण झाले असून 123 जण शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले असल्याचे मेमाणे यांनी सांगितले.

पंचायत समितीच्या मंगळवारी ता.14 रोजी झालेल्या मासिक सभेत जिल्हा परिषद शाळांतील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सभापती ललिता चव्हाण, उपसभापती उदय भोपे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे व सदस्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

Web Title: 175 students of Junnar taluka get scholarships