PDCC Bank : खरिपासाठी शेतकऱ्यांना १७८५ कोटींचे पीककर्ज; दोन लाख शेतकऱ्यांना फायदा

पुणे जिल्हा बँकेने यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज वाटपाचे एकूण १ हजार ८९० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे.
pune district bank
pune district bankSakal

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने (पीडीसीसी) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी आतापर्यंत एकूण १ हजार ७८४ कोटी ८४ लाख ९७ हजार रुपयांचे रुपयांचे (सुमारे अठराशे कोटी) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्ज वाटपाचे हे प्रमाण खरिपातील एकूण उद्दिष्टाच्या ९४.४४ टक्के इतके पूर्ण झाले आहे.

याचा जिल्ह्यातील दोन लाख १ हजार ५८० शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पीककर्ज वाटप केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी तीन महिने या कर्जाचा लाभ घेता येणार आहे.

जिल्हा बँकेने यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज वाटपाचे एकूण १ हजार ८९० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. यानुसार १ एप्रिल २०२३ पासून हे पीककर्ज वाटप करण्यास सुरवात केली असल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी गुरुवारी (ता.१३) सांगितले.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी एक हजार ५६४ कोटी ९५ लाख ६१ हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. पीककर्ज वाटपाचे हे प्रमाण गेल्यावर्षी ८६.८६ टक्के इतके होते. यंदा त्यात आणखी गेल्यावर्षीच्या तुलनेत ७.५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बॅंकेने गेल्या वर्षी खरीप हंगामातील पिकांसाठी १ हजार ८०१ कोटी ६५ लाख रुपयांच्या वाटपाचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात १ हजार ५६४ कोटी ९५ लाख ६१ हजार रुपयांचे वाटप केले होते.

खरीप पीककर्ज वाटप सद्यःस्थिती

- खरिपासाठी कर्ज वाटपाचे एकूण उद्दिष्ट --- १८९० कोटी रुपये

- आतापर्यंत पूर्ण झालेले कर्ज वाटप --- १७८४ कोटी ८४ लाख ९७ हजार रुपये

- पीककर्जाचा लाभ मिळालेले शेतकरी --- २ लाख १ हजार ५८०

- कर्ज वाटपाचे प्रमाण टक्केवारीत --- ९४.४४ टक्के

- गतवर्षीच्या तुलनेत झालेली वाढ टक्केवारीत --- ७.५८ टक्के

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज वाटप केले जात आहे. मागेल त्याला खरिपासाठी कर्ज देणे, हे बँकेचे धोरण आहे. यानुसार एकही पात्र शेतकरी पीककर्जापासून वंचित राहत नाही. पीककर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज हे पूर्वीप्रमाणे शून्य टक्के व्याजाने वाटप केले जात आहे.

- प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, जिल्हा बँक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com