Pune : टिळेकरनगर, येवलेवाडी रस्त्यासाठी १८ कोटी मंजूर

स्थायी समिती १८ काेटी २९ लाख २० हजार रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली
18 crore sanctioned for Tilekarnagar Yevlewadi road pune construction department
18 crore sanctioned for Tilekarnagar Yevlewadi road pune construction departmentsakal

पुणे : कात्रज कोंढवा रस्त्याचे रखडलेला काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झालेले असताना आता याच भागातील टिळेकरनगर येवलेवाडी २४ मीटर रस्त्याच्या कामाच्या कामही सुरू होणार आहे. यासाठी स्थायी समिती १८ काेटी २९ लाख २० हजार रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली आहे.

टिळेकरनगर, कामठेनगर, पानसरेनगर आणि येवलेवाडी मधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हा रस्ता रखडल्याने या भागातील नागरिकांना त्रास होत असल्याचे विषय ‘सकाळ’ने वारंवार मांडला होता.

कात्रज कोंढवा रस्त्यावर इस्कॉन मंदिर चौकाजवळून येवलेवाडीला जाणारा रस्ता अरुंद आहे. तो अर्धवट विकसित झाला असल्याने नागरिकांना गैरसोयीचा आहे. खडी मशिन चौकाकडून पानसरेनगर, येवलेवाडीला अवघड जात असल्याने हा पर्यायी रस्ता येवलेवाडीच्या नागरिकांसाठी सोयीचा आहे.

18 crore sanctioned for Tilekarnagar Yevlewadi road pune construction department
Pune : झाडाचे कटींग, फांद्या टाकणार्‍या विरुद्ध पोलिसात तक्रार, १० हजार दंड

तसेच हा रस्ता हा रस्ता खडी मशिन चौकाकडून बोपदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याला समांतर असणारा आहे. वाढती वाहतूक कोंडी यामुळे याचे काम लवकर व्हावे अशी मागणी केली जात आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात काम सुरू केले पण अवघे २०० फूट लांबीचे काम झाले. त्यानंतर हे काम हाती घेण्यात आले नाही. त्यानंतर या रस्त्यांच्या कामासाठी २२ कोटीचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले. या रस्त्यांच्या कामासाठी निविदा काढण्यात आली.

18 crore sanctioned for Tilekarnagar Yevlewadi road pune construction department
Pune Crime : निगडे गावठी दारू साठा प्रकरणी केवळ एका आरोपीवर कारवाई ; ज्यांनी तक्रार केली त्यांना 'पाहून घेण्याची भाषा

मे.साईप्रभा कन्स्ट्क्शनची १८ काेटी २९ लाख २० हजार रुपयांच्या निविदा आली. ही निविदा पुर्वगणनपत्रकापेक्षा १६ टक्कापेक्षा कमी दराने आली आहे. या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. या रस्त्याची एकूण लांबी २ किलोमीटर आहे. त्यापैकी १हजार ४०० मीटरचा लांबीचा रस्ता २४ मीटर रुंदी आहे. तर उर्वरित ६०० मीटर रस्ता १० मीटरचा आहे. या कामाला मंजुरी मिळाल्याने येत्या वर्षभरात हा रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com