पत्नीवर वार करणाऱ्याला १८ महिन्यांचा तुरुंगवास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

पत्नीवर संशय घेत तिच्यावर व नातेवाइकावर सुरीने वार करणाऱ्या पतीला १८ महिने तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला.

पुणे - पत्नीवर संशय घेत तिच्यावर व नातेवाइकावर सुरीने वार करणाऱ्या पतीला १८ महिने तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी हा निकाल दिला. जगनारायण रामदेव कनोजिया (रा. भैरवनाथ मंदिराशेजारी, आंबेगाव, मूळ रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी पत्नी जानकी जगनारायण कनोजिया यांनी भारती विद्यापीठ ठाण्यात फिर्याद दिली आहे. २५ ऑक्‍टोबर २०१७ रोजी ही घटना घडली होती. घटनेच्या दिवशी फिर्यादी यांचा मुलगा प्रियांशू आणि नातेवाईक अशोक रामदास चौधरी घरी झोपले होते. त्या वेळी जगनारायण याने चौधरी यांच्या मनगटावर, खांद्यावर सुरीने वार केले. फिर्यादी भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावरही सुरीने हल्ला केला. हा खटला सरकारी पक्षाच्या वतीने विजयसिंह जाधव यांनी चालवला.
 

Web Title: 18-month jail for war on wife