

Young Farmer Dies After Electric Shock from Agricultural Pump in Shirur
esakal
कवठे येमाई : पाण्याची टाकी भरण्यासाठी शेतातील विद्युत कृषी पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सविंदणे (ता. शिरूर) येथे बुधवारी (ता. ८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. गणेश भाऊसाहेब भोर असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.