पुणे जिल्ह्यात शुक्रवारी १८२ नवे कोरोना रुग्ण; दोघा जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

पुणे जिल्ह्यातील शुक्रवारी (ता.४) १८२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील १२० जणांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी १८२ नवे कोरोना रुग्ण; दोघा जणांचा मृत्यू

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) शुक्रवारी (ता.४) १८२ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील (Pune City) १२० जणांचा समावेश आहे. याउलट दिवसभरात जिल्ह्यातील ३३८ जण कोरोनामुक्त (Coronafree) झाले आहेत. अन्य दोघा जणांचा कोरोनाने मृत्यू (Death) झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूपैकी पुणे व पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) प्रत्येकी एक मृत्यू आहे. दिवसभरात जिल्हा परिषद, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकही मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवी रुग्णांमध्ये शहरातील १२० रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील २२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २८, नगरपालिका हद्दीतील आठ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील चार रूग्ण आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १९२ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ६६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६५, नगरपालिका हद्दीतील नऊ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीतील सहा जण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील ५९ विद्यार्थी अद्याप युक्रेनमध्येच

दरम्यान, पुणे जिल्ह्यात आता एकूण १ हजार ४०४ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी सध्या केवळ १३३ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत. उर्वरित १ हजार २७१ जण गृह विलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील फक्त ७३२ जण आहेत. गुरुवारच्या (ता.३) तुलनेत शुक्रवारी (ता.४) शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ७३ ने कमी झाली आहे. गुरुवारी (काल) हीच संख्या ८०५ इतकी होती.

जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये शहरातील ७३२ रुग्णांसह पिंपरी चिंचवडमधील २७४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ३०४, नगरपालिका हद्दीतील ५४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ४० रुग्ण आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज रात्री कोरोना शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा अहवाल प्रसिद्घ केला जातो. त्यातून ही आकडेवारी उघड झाली आहे.

Web Title: 182 New Corona Patients Found In Pune District Friday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punecorona patients
go to top