Indian Students
Indian StudentsSakal

पुणे जिल्ह्यातील ५९ विद्यार्थी अद्याप युक्रेनमध्येच

रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील ५९ विद्यार्थी अद्याप युक्रेनमध्येच अडकून पडले आहेत.
Published on
Summary

रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील ५९ विद्यार्थी अद्याप युक्रेनमध्येच अडकून पडले आहेत.

पुणे - रशिया-युक्रेन (Russia-Ukraine War) यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे शहर (Pune City) आणि जिल्ह्यातील ५९ विद्यार्थी (Students) अद्याप युक्रेनमध्येच (Ukraine) अडकून पडले आहेत. त्यामुळे पालकांची (Parents) चिंता वाढली आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील १३४ विद्यार्थी युक्रेन देशात वैद्यकीय शिक्षण आणि इतर प्रशिक्षणासाठी गेले होते. युद्ध सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ७५ विद्यार्थी मायदेशात परतले आहेत. बहुतांश विद्यार्थी हे युक्रेनमधील किव्ह आणि खारकिव शहरातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. रशियन सैन्याने युक्रेनमधील या दोन प्रमुख शहरांवरील हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे.

Indian Students
मोदींच्या कार्यक्रमाला पुणे महापालिकेतील नगरसेवक राहणार उपस्थित

युक्रेनमधून बाहेर पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना रोमानिया, पोलंड, स्लोव्हाकिया आणि हंगेरी या देशांच्या सीमेपर्यंत पोचण्याची गरज आहे. परंतु त्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना धडपड करावी लागत आहे. ‘‘जिल्हा प्रशासन हे राज्य सरकारच्या आपत्ती निवारण कक्ष आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या संपर्कात आहे,’’ असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

  • पुणे जिल्ह्यातून युक्रेनमध्ये गेलेले एकूण विद्यार्थी १३४

  • त्यापैकी भारतात परतलेले विद्यार्थी ७५

  • सध्या युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी ५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com