दौंड: पाणीपुरवठा योजनेसाठी १९ कोटींचा निधी मंजूर

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 4 एप्रिल 2018

दौंड : राज्य शासनाने दौंड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १९ कोटी ४० लाख रूपयांची योजना मंजूर केल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली. योजनांतर्गत स्वच्छ व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांची शहरांतर्गत ७१.६५ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था उभारली जाणार आहे. 

दौंड : राज्य शासनाने दौंड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १९ कोटी ४० लाख रूपयांची योजना मंजूर केल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली. योजनांतर्गत स्वच्छ व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांची शहरांतर्गत ७१.६५ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था उभारली जाणार आहे. 

दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर निधी पैकी ८ कोटी १६ लाख रूपये जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांच्यासह प्रकाश भालेराव, राजेश गायकवाड, शहानवाझ पठाण, राजू बारवकर, सतीश थोरात, आदी या वेळी उपस्थित होते. नगरपालिकेच्या ३० ते ३५ वर्षांपूर्वीच्या लोखंडी जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून सध्याची पाणी वितरण व्यवस्था ६८.८४ किलोमीटर लांबीची आहे. 

नवीन योजनेनुसार शहरांतर्गत ७१.६५ किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी हाय डेन्सिटी पॅालीईथलीन (एचडीपीई) जलवाहिन्या आणि वितरण व्यवस्थेसाठी ३.३६ किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी डक्टाईल आर्यन पाइप (के-७ प्रकार) टाकले जाणार असून, त्यांचा एकत्रित खर्च ८ कोटी ७५ लाख ७५ हजार रूपये इतका आहे. शुध्द पाण्याच्या पुरवठ्यासाठी ५.७९ किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी के-७ प्रकारचे पाइप टाकले जाणार असून, त्याचा खर्च ३ कोटी ४९ लाख ९६ हजार रूपये इतका अपेक्षित आहे.

योजनेत प्रक्रिया प्रकल्पासाठी ४ कोटी ३७ लाख रूपये, शुध्द पाणी पंपींग यंत्रणेसाठी १ कोटी ६ लाख  रूपये,साठवण तलावात ७ लाख लीटर क्षमतेचा भूमीगत जलाशयासाठी ३७ लाख ४७ हजार रूपये खर्च केले जाणार आहेत. 

दोन्ही पाणीपुरवठा योजना युतीच्या काळातील....
युती शासनाचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंजूरीमुळे दौंड नगरपालिकेचा ७५६ दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेच्या नवीन साठवण तलावाची निर्मिती करण्यात आली होती. महायुतीचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ताधारी भाजपचे सहयोगी सदस्य असलेले आमदार राहुल कुल यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांनी १९. ४० कोटी रूपयांची नवीन मंजूर केली आहे. 

Web Title: 19 crores sanctioned for water supply scheme