औंधमधील `त्या` व्यक्तिच्या संपर्कातील १९ जणांचा रिपोर्ट...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

औंध येथील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर परिसरात घबराट निर्माण झाली होती.

une-news">पुणे) : येथील एका सोसायटीतील एक व्यक्ती कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या १९ जणांचे तपासणी नंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी (ता.१८) औंध येथील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर परिसरात घबराट निर्माण झाली होती.

हातावरचे पोट असलेल्यांचा संसार येणार रूळावर 

लाॅकडाउनच्या  मागील तीनही टप्प्यात येथे कुठलाही रुग्ण आढळून आलेला नव्हता. त्यामुळे हा परिसर कोरोना पासून दूर होता. परंतु सोमवारी रुग्ण आढळल्याने या भागात कोरोनाचा शिरकाव झाला. संबंधित रुग्णाच्या शेजारील व ज्या व्यक्ती संपर्कात आल्या होत्या त्यांचा शोध घेऊन पालिकेच्या बोपोडी येथील कै. द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर  दवाखान्यात तपासणी करण्यात आली होती.

....म्हणून यूपीतील चित्रकुट येथील महिलेने पुणेकरांचे मानले आभार

आज त्या सर्व एकोणीस जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डमाळे यांनी सांगितले. तर प्रशासनाकडून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संबंधित  व्यक्तींना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर खबरदारी म्हणून सर्वांना क्वारंटाइन करण्यात आल्याचे व सोसायटीत  निर्जंतुकीकरण करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार यांनी सांगितले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

आजपर्यंत औंध किंवा गावठाण परिसरात एकही रुग्ण आढळून आला नव्हता परंतु आता पहिला स्थानिक रुग्ण आढळल्याने या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. असे असले तरी कोणीही घाबरून जायची आवश्यकता नाही कारण संबंधित रुग्ण व्यक्ती जरी औंध येथील असली तरी त्यांचा सोसायटीत कुणाशीही जास्त संपर्क आलेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी सारख्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. संबंधित रुग्णाची पत्नी निगेटिव्ह असून एकट्यालाच कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तरी नागरीकांनी कुठल्याही प्रकारे भीती न बाळगता नियमित मास्क, सॅनिटायझरचा वापर  करत सुरक्षित अंतर राखण्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 people in aundh not affected by corona