पुण्यात अपहरण करून चिमुकलीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

अडीच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून खून केल्याची घटना पिंपळे सौदागर येथे मंगळवारी उघडकीस आली.   

पिंपरी : अडीच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून खून केल्याची घटना पिंपळे सौदागर येथे मंगळवारी उघडकीस आली.   

पिंपळे सौदागर येथे एका इमारतीचे काम सुरू आहे  त्या ठिकाणी ही चिमुकली आई वडिलांसोबत राहत होती. सोमवारी (ता. 22) सायंकाळी ही चिमुकली बेपत्ता झाली. तिच्या नातेवाइकांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र कुठेही तिचा पत्ता लागला नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी पिंपळे सौदागर येथे तिचा मृतदेह आढळून आला.

या घटनेत मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलीचा मृतदेह औंध रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 and half year girl killed after kidnapping in Pimpri Pune