esakal | आंबेगाव तालुक्यातील 'या' भागात सापडले 2 कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

2 corona positive found Ambegaon Taluka

महिलेचे पती मुंबई येथील एका पतसंस्थेत कामाला आहे. दोन दिवसापूर्वी ते चासला येऊन आपल्या मुलगा व पती पत्नीला सोडून पनवेल ला गेले. तेथे पॉझिटिव्ह झाल्याने त्यांना मुंबई येथील दवाखान्यात ऍडमिट केले आहे.

आंबेगाव तालुक्यातील 'या' भागात सापडले 2 कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
चंद्रकांत घोडेकर, घोडेगाव

घोडेगाव : चास (ता.आंबेगाव) येथील एक महिला (वय २५ वर्ष) व एक मुलगा (वय 1 वर्ष) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या तालुक्यात ४९ पैकी ४२ रुग्ण बरे झाले असून एक मयत आहेत तर, ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथे सापडलेले दोन्ही रुग्ण हे पनवेल येथे राहत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महिलेचे पती मुंबई येथील एका पतसंस्थेत कामाला आहे. दोन दिवसापूर्वी ते चासला येऊन आपल्या मुलगा व पती पत्नीला सोडून पनवेल ला गेले. तेथे पॉझिटिव्ह झाल्याने त्यांना मुंबई येथील दवाखान्यात ऍडमिट केले आहे. मुलगा व पत्नीला त्रास होऊ लागल्याने त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दोन दिवसापूर्वी त्यांना यशवंतराव चव्हाण येथील रुग्णालयात नेले. तपासणीनंतर त्यांचा दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, चिंचोली येथे एक रुग्ण दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह झाला आहे. या परिसरातील गिरवली, चिंचोली, नारोडी, चास येथे रुग्ण सापडल्याने हा परिसर रेडझोन झाला आहे. तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे मुंबई कनेक्शन अजूनही सुरूच आहे. मुंबईहून आलेले व्यक्तींनी स्वतःहून चौदा दिवस व्हावे अशी सूचना गाव पातळीवरील कमिटीला  गट विकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी केले आहे.

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

loading image