इंदापूर तालुक्यासाठी २ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी : प्रवीण माने

Drinking_Water.jpg
Drinking_Water.jpg

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील चार गावासांठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजेल योजनेतंर्गत २ कोटी ५२ लाख ३५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा आराखडा जुनमध्ये तयार करण्यात आला होता. आराखड्यातील गावांना यापूर्वीच मंजूरी मिळाली होती. मात्र तालुक्यतील चार गावांना पाणी पुरवठा योजनेची गरज असल्याने पुरवणी आराखडा तयार करुन शासनाकडे मंजूरीसाठी पाठवला होता.

१२ ऑक्टोबरच्या बैठकीमध्ये बेलवाडी गावासाठी ७६ लाख ५५ हजार रुपये, बिजवडी गावासाठी ७० लाख ४० हजार रुपये, सराटी गावासाठी ७५ लाख रुपये व गंगावळण गावासाठी ३० लाख ४० हजार रुपये मंजूर झाले आहे. या योजनमुळे या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लागण्यास मोलाची मदत होणार आहे. इंदापूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी जास्तीजास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे माने यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com