वाहनाच्या धडकेत दोन वारकरी महिलांचा मृत्यू 

संदीप घिसे 
बुधवार, 4 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला. ही घटना मोशी येथे बुधवारी पहाटे घडली.

पिंपरी (पुणे) : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला. ही घटना मोशी येथे बुधवारी पहाटे घडली.

जनाबाई अनंता साबळे (वय 55) आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय 60) अशी अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. त्या बीड आंबेजोगाई येथून पालखीसाठी दिंडीने देहूकडे चालल्या होत्या. बोऱ्हाडेवाडी मोशी येथे त्या मुक्कामाला होत्या. बुधवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्या प्रातःविधीसाठी चालल्या होत्या. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्या दोघींना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघींना वायसीएम रुग्णालय येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.

Web Title: 2 ladies warkari dies in accident