रोहोकडी येथे सव्वादोन लाखाची घरफोडी

पराग जगताप
बुधवार, 5 डिसेंबर 2018

रोहोकडी (ता.जुन्नर) : येथे बंद घरात घरफोडी करुन अज्ञात चोरट्यानी रोख रक्कमेसह सव्वादोन लाखा पेक्षा जास्त किंमतीचा ऐवज चोरुन नेला. याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे ठाण अमंलदार पी. डी. मोहरे म्हणाले कि, ''रोहोकडी येथे राहात असलेले सेवा निवृत्त शिक्षक पांडुरंग गणपत मुरादे यांनी फिर्याद दिली. ते शनिवारी घराला कुलुप लावुन कार्तिकी एकादशी निमीत्त आळंदीला गेले होते.  मंगळवारी दुपारी घरी परतल्या नतंर त्यांना घराच्या दाराचा कडी कोंयडा कापलेला होता.घरातील दोन्ही लोखंडी कपाटे उघडी करुन त्यांतील सामान अस्त व्यस्त पडलेले होते.

रोहोकडी (ता.जुन्नर) : येथे बंद घरात घरफोडी करुन अज्ञात चोरट्यानी रोख रक्कमेसह सव्वादोन लाखा पेक्षा जास्त किंमतीचा ऐवज चोरुन नेला. याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे ठाण अमंलदार पी. डी. मोहरे म्हणाले कि, ''रोहोकडी येथे राहात असलेले सेवा निवृत्त शिक्षक पांडुरंग गणपत मुरादे यांनी फिर्याद दिली. ते शनिवारी घराला कुलुप लावुन कार्तिकी एकादशी निमीत्त आळंदीला गेले होते.  मंगळवारी दुपारी घरी परतल्या नतंर त्यांना घराच्या दाराचा कडी कोंयडा कापलेला होता.घरातील दोन्ही लोखंडी कपाटे उघडी करुन त्यांतील सामान अस्त व्यस्त पडलेले होते. तसेच, कपाटातील एक लाख बारा हजार पाचशे रुपये रोख तसेच ४५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे तीन तोळ्याचे मंगळसुत्र,३० हजार रुपये किंमतीचे दोन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, २२ हजार ५०० रुपयाचे अर्धा तोळे वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या,२ हजार रुपये किंमतीची चांदीची साखळी व पैजंन,१५ हजार रुपये किंमतीचे अर्धा तोळे वजनाची दोन कर्ण फुले व सोन्याची वेल असे एकुण रोख रक्कमेसह २ लाख २७ रुपयांची अज्ञात चोरट्यानी चोरी केली आहे.''

सदर घटना कळताच जुन्नर पोलीस उपविभागीय अधिकारी दिपाली खन्ना यांनी घटनास्थळी भेट देवुन पहाणी केली.पुढील तपास ओतूरचे सहायक पोलीस निरिक्षक रमेश खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रशांत यम्मेवार करीत आहे.
 

Web Title: 2 lakh 15 thousand burglar at Rohokadi