पुणे जिल्ह्यात आज २०९८ नवे पॉझिटिव्ह; तर 'एवढ्या' जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

-जिल्ह्यात आज २०९८ नवे कोरोना रुग्ण 

-शहरातील ११९२ जण : ५६ रुग्णांचा मृत्यू 

पुणे  : पुणे जिल्ह्यात आज (ता.४) दिवसभरात २ हजार ९८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार १९२ जणांचा समावेश आहे. आज ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा - शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

यामुळे पुणे जिल्ह्यातील आज अखेरपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ९४ हजार ९७८ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत दोन हजार १८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार १९२,  पिंपरी चिंचवडमधील ६२९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १८१,   नगरपालिका क्षेत्रातील ८२ आणि  कॅंंटोन्मेंट बोर्डातील १४ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज दिवसभरात ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. ३) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. ४) रात्री नऊ वाजेपर्यंतची  आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २८ जण आहेत. यांशिवाय  पिंपरी चिंचवडमधील १४,  जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८ आणि नगरपालिका व कॅंंटोन्मेंट बोर्डातील मिळून ६ जणांचा समावेश आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 thousand 98 citizens infected with corona in Pune district today