दत्तात्रेय भरणे म्हणताहेत, कोरोना बाधितांनो घाबरू नका पण...

संदेश शहा
Friday, 4 September 2020

वालचंदनगर व बावडा येथे कोविड केअर सेंटर उभारणीस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता सजग रहावे असा सल्ला सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिला.

इंदापूर (पुणे) : कोरोना हे जागतिक संकट असून या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी शासन सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. इंदापूर तालुक्यात तपासणीची संख्या वाढल्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. इंदापूर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी 2 हजार सुसज्ज खाटांचे नियोजन करण्यात आले असून इंदापूर येथे लाईफ सपोर्ट रुग्णवाहिकेची देखील सोय करण्यात आली आहे. तर वालचंदनगर व बावडा येथे कोविड केअर सेंटर उभारणीस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता सजग रहावे असा सल्ला सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिला.

पुण्यातील रुग्णांच्या नातेवाइकांनी घेतला धसका 

 इंदापूर शहर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात कोरोना आढावा बैठकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हाधिकारी राजेशदेशमुख, जिल्हा परीषद मुख्याधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त अधिकारी हिंमतराव खराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापुरकर उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर, दिलीप पवार, जीवन माने, वैद्यकीय अधिक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. सुरेखा पोळ, डॉ. सुहास शेळके, डॉ. मिलींद खाडे, रघुनाथ गोफणे, किशोर साळुंखे यांनी आपला आढावा सादर केला. 

पुण्यातील जम्बो व्हेंटिलेटरवर; ‘लाइफलाइन’ ला ‘पीएमआरडीए’ची नोटीस

राज्यमंत्री भरणे पुढे म्हणाले, तालुक्यात आज पर्यंत ९१६ रुग्णांची नोंद झाली असून ग्रामीण भागात ६६३ व शहरात २५३ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ३५१ रुग्णांवर उपचार चालू असून ग्रामीण भागात २६५ तर शहरात ८६ रुग्ण उपचार घेत आहेत. नागरिकांनी आरोग्य रक्षणास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत जिल्ह्यात तीन पटीने कोरोना चाचणीचा वेग वाढला असल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. इंदापूर तालुक्यात दोन वेळा आम्ही दौरा केला असून रोज अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. तालुक्यात ऑक्सिजन बेडसाठी निधी उपलब्ध केला असून ११० बेड व १८ व्हेंटिलेटरची व्यवस्था तात्काळ करण्याचेआदेश दिले आहेत. तालुक्यात १० प्रकारच्याआरोग्य सेवेसाठी एकूण ७१ आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना कामाच्या ठिकाणी रुजू केले आहे. उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर लवकरच सुरू होत आहे असे सूतोवाच त्यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 thousand beds for treatment of corona infected patients in Indapur taluka