Video : भोरजवळ कंपनीत बॉयलरचा स्फोट; दोन कामगारांचा मृत्यू

महेंद्र शिंदे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

आज सकाळी ही घटना घडली. बॉयलरचा स्फोट एवढा भीषण होता की कामगारांचे मृतदेह सुमारे 250 फूट उडाले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविले.

पुणे : जिल्ह्यातील वेळू (ता. भोर) येथील सी. पी. एच. मॅन्यूफॅक्चरिंग एलएलपी या कंपनीत आज (बुधवार) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ही घटना घडली. बॉयलरचा स्फोट एवढा भीषण होता की कामगारांचे मृतदेह सुमारे 250 फूट उडाले. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविले.

पोलिस घटनास्थळी दाखल असून, तपास करीत आहेत. आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 workers dead in blast at boiler company in Bhor