पुण्यात 20 मजली इमारतीवरून पडून 2 कामगारांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

कोथरूड महात्मा सोसायटीच्या पुढे असलेल्या एका 20 मजली इमारतीच्या लिफ्टचे काम सुरु होते. त्यावेळी काम करणाऱ्या दोन कामगाराचा व वरुन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे.

पुणे : कोथरुड येथील एका इमारतीमध्ये लिफ्टचे काम करणाऱ्या दोन कामगारांचा खाली पडून मृत्यू झाल्याची घडना घडली आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे. 

कोथरूड महात्मा सोसायटीच्या पुढे असलेल्या एका 20 मजली इमारतीच्या लिफ्टचे काम सुरु होते. त्यावेळी काम करणाऱ्या दोन कामगाराचा व वरुन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे. कामगाराना रुग्णलयात दाखल केले, मात्र त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 workers die due to falling from 20 storey building In Pune