Pune News : निरगुडसर येथे 33 गायींचा विषबाधेमुळे मृत्यू; राजस्थानी व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

निरगुडसर परिसरात राजस्थानी दूध व्यावसायिक हे गेल्या अनेक वर्षापासून या भागात वास्तव्य करत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन गाईच
20 cows die due to poisoning in nirgudsar rajasthani businessmen loss pune marathi news
20 cows die due to poisoning in nirgudsar rajasthani businessmen loss pune marathi newsSakal

निरगुडसर : येथे अनेक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या राजस्थान येथील दुग्ध व्यावसायिक हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांच्या १६ गाई आणि ४ कालवडी अश्या एकूण २० लालगाई बटाट्याचा पाला खाऊन विषबाधा झाल्याने मृत्युमुखी पडल्या आहेत त्यामुळे राजस्थानी व्यावसायिकांचे १० ते १५ लाखाचे नुकसान झाले आहे.

निरगुडसर-मेंगडेवाडी हद्दीवरील रस्त्यावर राजस्थान येथून आलेले लालगाई वाले व्यावसायिक गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत,त्यांच्याकडे १५० गाई,कालवडी, वासरे आहेत. ते आपला उदरनिर्वाह करण्यासाठी लाल गाई पाळतात.

दुग्ध व्यवसाय व शेणखत विक्रीकरुन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात तसेच निरगुडसर व आजूबाजूच्या परिसरातील फ्लॉवर, बटाटा पाला, कांद्याची पात व शेतकऱ्यांच्या शेतात सोडून दिलेला भाजीपाला,

तरकारी ते त्यांच्या गायीना खाण्यासाठी दररोज घेऊन येत असतात, दोन दिवसापूर्वी हिरा खोडा भरवाड, काना वामा भरवाड, देवकन गंगाजी भरवाड यांनी आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील एका शेतकऱ्याचा शेतात कापून ठेवलेला बटाटयाचा पाला गायींना खाण्यासाठी आणला होता.

हा पाला खाल्ल्यानंतर त्यांच्या गायांना विषबाधा झाली त्यामध्ये १६ गाई आणि ४ कालवडी अशा एकूण २० गायी मृत्युमुखी पडल्या आहेत तर ३० ते ४० गायींना विष बाधा होऊन अत्यवस्थ आहेत.गेल्या दोन दिवसापासून डॉक्टरांकडून गायींवर उपचार सुरु आहेत.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे पाटील यांनी तातडीने प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना घटनेचे गांभीर्य कळवल्यानंतर तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले,त्यानुसार निरगुडसर गावचे तलाठी पी एम मुगदळे,

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.तळेकर यांनी घटनास्थळी येऊन तातडीने पंचनामा केले आहे. सरपंच रवींद्र वळसे पाटील,माजी उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष कोरके, विक्रम मेंगडे, हरिश सुडके यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

20 cows die due to poisoning in nirgudsar rajasthani businessmen loss pune marathi news
Pune Crime News : लोहगावमध्ये बंद घरात आढळले पती-पत्नीचे मृतदेह; नेमकं घडलं तरी काय?

निरगुडसर परिसरात राजस्थानी दूध व्यावसायिक हे गेल्या अनेक वर्षापासून या भागात वास्तव्य करत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन गाईच आहेत. त्यांच्या 33 गाया दगावल्याने त्यांचे अंदाजे १० ते १५ लाखांचे नुकसान झाले आहे अजून गायी दगवल्या तर तो आकडा ५० लाखांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. गायांचा कुठलाही इन्शुरन्स नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळणे कठीण आहे.

प्रांताधिकारी गोविंद शिंदे म्हणाले की, निरगुडसर येथे विष बाधेमुळे मृत्यू झालेल्या राजस्थानी लाल गायींचे पंचनामे करण्यात आले आहे,ते राजस्थान मधील असल्याने त्यांच्याकडे येथील नागरिकत्व नाही,गायींचा विमा देखील नाही परंतु झालेले नुकसान मोठे असल्याने विशेष बाब म्हणून त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. फोटो खाली ओळ: निरगुडसर ता.आंबेगाव विषबाधा होऊन अत्यवस्थ झालेल्या राजस्थानी गायी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com