Coronavirus : पुणे जिल्ह्यातील 'ही' २० तपासणी केंद्रे सुरू राहणार २४x७!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

पुणे विभागात बुधवारअखेर एकूण 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात पुणे जिल्ह्यातील 15 आणि सातारा जिल्ह्यातील एक रुग्ण आहे.

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही वाढत असलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये २० तपासणी नाके सुरू करण्यात येणार आहेत. या सर्व  नाक्यांवर प्रत्येकी एक अधिकारी आणि एक कर्मचारी अशा दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तपासणी  नाक्यांवर ग्रामीण भागात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची इन्फ्रारेड थर्मामिटरद्वारे तपासणी केली जाणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामध्ये सर्वाधिक सात नाके हे हवेली तालुक्यात आहेत. त्यापाठोपाठ मुळशी तालुक्यात चार नाके असणार आहेत. शिरूर तालुक्यात एक तर, मावळ, खेड, जुन्नर आणि भोर या तालुक्यात प्रत्येकी दोन तपासणी नाके असणार आहेत.

या नाक्यांवर तपासणी करताना कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्यास, संबंधित व्यक्तीची जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

- बारामतीत राबविणार 'भिलवाडा पॅटर्न'; अजित पवार यांचे संकेत!

तालुकानिहाय तपासणी नाके पुढीलप्रमाणे :-

हवेली - देहू, खेड शिवापूर, कदमवाकवस्ती, वडकी, वाघोली, नांदेड, कोंढवे-धावडे.

मुळशी - हिंजवडी, ताम्हिणी, भूगाव व सुस.

मावळ - सोमाटणे व लोणावळा. खेड - चिंबळी व मोई. जुन्नर - माळशेज व आळेफाटा. भोर - वेळू व सारोळा आणि शिरूर - शिरूर ग्रामीण.

- Video : 'आपल्या भविष्यकाळाकडून...'; मुक्ता बर्वे काय सांगतेय ते बघाच!

दरम्यान, पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या बुधवारी 229 झाली आहे. त्यात पुणे जिल्ह्यात 194, सातारा 6, सांगली 26 आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे. पुणे विभागात बुधवारअखेर एकूण 16 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात पुणे जिल्ह्यातील 15 आणि सातारा जिल्ह्यातील एक रुग्ण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 inspection centres will be started for checking Coronavirus in Pune district