esakal | अरे वा, बारामतीतील विद्यार्थ्यांना लॉकडाउनमध्ये मिळाल्या नोकऱ्या  
sakal

बोलून बातमी शोधा

job

लॉकडाउनच्या सर्व नियमांच्या अधीन राहून कंपनीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखती घेऊन त्यातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली.

अरे वा, बारामतीतील विद्यार्थ्यांना लॉकडाउनमध्ये मिळाल्या नोकऱ्या  

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : ज्ञान हीच बदलत्या काळात सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे सातत्याने ज्ञान संपादन करा, हा मूलमंत्र विद्यार्थ्यांना देणा-या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेतील वीस विद्यार्थ्यांना एमक्युअर फार्मास्युटीकल कंपनीने नोकरी देऊ केली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली.

कोरोना झाला आमदारांना...ग्रामस्थांचा जीव टांगणीला
 
विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या पदवी व पदव्युत्तर विभागातील वीस विद्यार्थ्यांना एमक्युअर फार्मास्युटीकल कंपनीत निवड झाली आहे. लॉकडाउनच्या काळात परिस्थिती बदलली आहे, अनेक ठिकाणी लोकांच्या नोक-या धोक्यात येत असताना विद्या प्रतिष्ठानच्या मुलांना मात्र नोकरीची संधी मिळाली, ही बाब उल्लेखनीय आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या व संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.  

हवेलीतील रुग्णांची संख्या पोहचली...

लॉकडाउनच्या सर्व नियमांच्या अधीन राहून कंपनीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखती घेऊन त्यातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली. या निवड प्रक्रियेसाठी कंपनीचे जनरल मॅनेजर कॅप्टन अंकुश पवार (निवृत्त) व प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उपप्राचार्य डॉ.  लालासाहेब काशीद, डॉ. संगीता सातपुते, प्लेसमेंट सेलचे प्रमुख  गजानन जोशी,  नीलिमा पेंढारकर,  डॉ. संजय कांबळे व रसायनशास्र विभागातील सर्व सहकारी प्राध्यापकांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्तांनी समाधान व्यक्त केले. तसेच, यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.