उत्साहाला गालबोट; हडसर किल्ल्यावरून पडून तरूणीचा मृत्यू!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

ही तरुणी मुंबईची स्थानिक रहिवासी असून ती तिच्या मित्रांसोबत या किल्ल्यावर आली होती.

पुणे : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती जगभरात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर शिवभक्तांनी गर्दी केली होती. शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरी केली जात असताना या उत्साहाला गालबोट लागेल, अशी घटना घडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जुन्नर तालुक्यातील हडसर किल्ल्यावरून पडून एका २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.१९) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. ही तरुणी मुंबईची स्थानिक रहिवासी असून ती तिच्या मित्रांसोबत या किल्ल्यावर आली होती. त्यांचा पूर्ण ग्रुप शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी हडसर किल्ल्यावर आला होता. त्यावेळी ही घटना घडली. त्यामुळे उत्साहाला गालबोट लागले आहे. 

- Shivjayanti 2020 : असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर, पत्र अजूनही सुरक्षित​

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमधील एक ग्रुप शिवजयंती साजरी करण्यासाठी हडसर किल्ल्यावर दाखल झाला होता. त्यातील एक तरुणी किल्ल्यावरून खाली पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. ही दु:खद घटना सकाळी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

- हे महाराज झोपले काट्याकुट्यांवर, म्हणाले इंदुरीकर महाराजांचं बरोबर

सदर घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबतची माहिती पोलिसांनी मृत तरुणीच्या कुटुंबियांना दिली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

- धक्कादायक! जेवणाच्या ताटावरून जवानांना उठवले

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 20 years girl dies after falling from Hadsar fort on the day of Shivjayanti