हे महाराज झोपले काट्याकुट्यांवर, म्हणाले इंदुरीकर महाराजांचं बरोबर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

बीड तालुक्यातील तांदळवाडी गावात या महाराजांची अजब साधना सुरु आहे. या साधनेतील महाराजांना पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोकांची गर्दी होत आहे. सोशल मीडीयावरही सध्या याच महाराजांचा बोलबाला आहे.  

बीड : शरीराच्या कुठल्याही भागाला काटा टोचला, तर तोंडावाटे ‘आई’ हा शब्द निघतो आणि डोळ्याची पापणी तात्काळ पाणावते. परंतु, निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ भगवान महाराज यांनी बाभळीच्या काटेरी फांद्यावर निद्रासाधना सुरू केली.

बीड तालुक्यातील तांदळवाडी गावात या महाराजांची अजब साधना सुरु आहे. या साधनेतील महाराजांना पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोकांची गर्दी होत आहे. सोशल मीडीयावरही सध्या याच महाराजांचा बोलबाला आहे.  

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या एका वक्तव्यावरुन सध्या राज्यात वादळ पेटलेले आहे. त्यांच्या समर्थनार्थ विविध घटक समोर येत आहेत. त्यातच भगवान महाराज यांनी आगळ्या पद्धतीने निवृत्ती महाराजांचे समर्थन केले आहे.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

बीड पासून साधारण २० किलोमिटर अंतरावरील तांदळवाडीतील संगमेश्वर संस्थानच्या परिसरात त्यांनी बाभळीच्या टोकदार काट्याच्या फांद्यावर निद्रासाधना सुरु केली आहे.

शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके वाचा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhagwan Maharaj Supported Indurikar Maharaj Beed News

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: