पुणे : दोनशे खासगी बस गाड्या मार्गस्थ

पुणे शहरातील स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजी नगर), पिंपरीतील वल्लभनगर, पुणे स्टेशन या स्थानकांवरून औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, मुंबई, ठाणे आदी मार्गावर सुमारे २०० खासगी बस गाड्या सोडण्यात आल्या.
Swargate Bus Stand
Swargate Bus StandSakal

पुणे - पुणे शहरातील स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजी नगर), पिंपरीतील वल्लभनगर, पुणे स्टेशन या स्थानकांवरून औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, मुंबई, ठाणे आदी मार्गावर सुमारे २०० खासगी बस गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेले प्रवाशांचे हाल थांबले. सरकारच्या निर्णयामुळे प्रवासी सुखावले, तर एसटी कामगार दुखावले आहेत.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी समजण्यात यावे. तसेच विविध मागण्यांसाठी सोमवारपासून (ता.८) पुकारलेल्या संपात सलग तिसऱ्या दिवशी एसटी कामगार सहभागी झाले होते. एसटी बसच्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बुधवारी (ता.१०) सकाळी ६ वाजल्यापासून पुणे शहरातील सर्व एसटी स्थानकावर खासगी बसची वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून मंगळवारी (ता.९) घेण्यात आला होता. खासगी बस एसटी स्थानकावर सकाळी ६ वाजताच दाखल झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ओस पडलेल्या स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजी नगर), पुणे स्टेशन आदी एसटी स्थानके प्रवाशांच्या गर्दीने गजबजले होते.

Swargate Bus Stand
पुणे : पुनर्वसनाच्या कार्यवाहीमुळे शिवाजीनगरमधील वाहतुकीत बदल

राज्यातील व परराज्यातील ८३५ मार्गावर ऑल इंडिया परमिटच्या डेली रूट बस चालणाऱ्या बसेस सोडण्यात आल्या. या मार्गासाठी पुणे परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ठरवून दिलेल्या दरांप्रमाणेच तिकीट दर आकारण्यात आले.

त्यामुळे प्रवासी आणि गाडी मालक यांच्यात समन्वय दिसून आला. जादा भाडे कोणी आकारात असेल तर याची तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन प्रवाशांना आरटीओ केले होते. मात्र गाडीच्या काचेवर प्रवास भाड्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे वाद होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही, असे राज्य प्रवासी व मालवाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, स्थानकावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच खासगी बस प्रवासी वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये. यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोल्हापूरमध्ये खासगी बसवर दगडफेक

ठरविल्याप्रमाणे प्रवाशांसाठी सुरू केलेली खासगी बस सेवा दिवसभरात यशस्वी पार पडली. पुणे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, कोल्हापूर येथे एका खासगी बसवर दगड फेक करण्यात आली. यामध्ये चालक जखमी झाला, असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले.

एसटी कामगारांच्या संपामुळे पीएमपीला देखील ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सातारा, सोलापूर, सासवड या मार्गावरील ग्रामीण भागात पीएमपीने वाहतूक पूर्ण क्षमेतेने सुरू ठेवली होती. पीएमपीच्या १३६ गाड्या या मार्गावर सोडण्यात आल्या होत्या.

- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com