पुणे : पुनर्वसनाच्या कार्यवाहीमुळे शिवाजीनगरमधील वाहतुकीत बदल

मेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर येथील कामगार पुतळा, राजीव गांधीनगर येथील रहिवासी झोपडपट्टीधारक यांच्या पुनर्वसनाची कार्यवाही गुरुवारी (ता. ११) होणार आहे.
पुणे : पुनर्वसनाच्या कार्यवाहीमुळे शिवाजीनगरमधील वाहतुकीत बदल

पुणे - मेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर येथील कामगार पुतळा, राजीव गांधीनगर येथील रहिवासी झोपडपट्टीधारक यांच्या पुनर्वसनाची कार्यवाही गुरुवारी (ता. ११) होणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलिस आयुक्त राहुल श्रीरामे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

- संचेती हॉस्पिटल समोरील रोडवरील अंडरपासमधून शिवाजीनगर न्यायालयाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पुणे रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांनी इंजिनिअरिंग चौक, आरटीओ चौक मार्गे पुणे स्टेशन रोडने इच्छित स्थळी जावे.

पुणे : पुनर्वसनाच्या कार्यवाहीमुळे शिवाजीनगरमधील वाहतुकीत बदल
शनिवारवाड्याच्या दुरूस्तीसाठी केंद्रीय मंत्र्यांचे आश्‍वासन

- शिवाजीरोड, विद्यापीठरोडवरून शिवाजीनगर न्यायालयात जाणाऱ्या वाहन चालकांनी संचेती हॉस्पिटल चौकाकडून इंजिनिअरिंग कॉलेज चौकातून पुढे लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालय समोर यु-टर्न घेऊन परत इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुलावरून संचेती चौकातून डावीकडे न्यायालयाकडे जावे.

- पुणे महानगर पालिका भवनकडून कुंभारवाडा चौकाकडे जाणाऱ्या जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नवीन डेंगळे पुलावरून दुहेरी वाहतूक चालू करण्यात येईल. ठुबे पार्क समोरील भुयारी मार्ग बंद करण्यात आला असून

-शिवाजीनगर न्यायालयात जाणाऱ्या वाहनांनी संचेती चौकातून इंजिनिअरिंग चौकातून पुढे लोहमार्ग पोलिस अधिक्षक कार्यालयाला युटर्न घेऊन परत इंजिनिअरिंग कॉलेज पुलावरून संचेती चौकातून डावीकडे न्यायालयाकडे जावे.

- नवीन डेंगळे पुलाकडून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाकडून व पालिका भवनकडून राजीव गांधीनगर वसाहतीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com