Pune News : महापालिकेत समाविष्ट गावात टँकरच्या २०० फेऱ्या वाढणार

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी त्यांच्या फेऱ्या अपुऱ्या आहेत. काही भागात चार दिवसांनी एकदा टँकर पोहचत आहे.
Water Tanker
Water Tankeresakal

पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी त्यांच्या फेऱ्या अपुऱ्या आहेत. काही भागात चार दिवसांनी एकदा टँकर पोहचत आहे. ही स्थिती गंभीर असून, समाविष्ट गावांमध्ये रोज १२०० ऐवजी १४०० टँकरच्या फेऱ्या केल्या जाणार आहेत. टँकरच्या २०० फेऱ्या वाढविण्यासंदर्भात पाणी पुरवठा विभागला आदेश दिले आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

समाविष्ट ३४ गावातील पाणी टंचाईच्या पार्श्‍वभूमिवर आयुक्तांनी उंड्री, पिसोळी, फुरसुंगी, मांजरी या भागात पाहणी केली. तसेच इतर गावांमधील पाणी पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला.

समाविष्ट गावांमध्ये सध्या ज्या भागात पूर्वीच्या पाणी पुरवठा योजनेनुसार नळाद्वारे पाणी दिले जाते. त्यांची माहिती संकलित केली जात आहे. तसेच या गावात सुमारे १२५ टाक्यांची व्यवस्था तातडीने केल्यास अनेक ठिकाणची पाणी टंचाईची भीषण स्थिती कमी होऊ शकते. तसेच या ३४ गावांमध्ये महापालिकेतर्फे रोज १२०० टँकरच्या फेऱ्या केल्या जात आहेत.

तरीही ही संख्या अपुरी आहे. एकदा टँकर येऊन गेल्यानंतर तीन दिवस, चार दिवस वाट पहावी लागत आहे. ही भीषणता कमी करण्यासाठी टँकरच्या २०० फेऱ्या वाढविण्यात येतील त्यामुळे एक दिवसाआड टँकर पोचेल अशी व्यवस्था केली जाणार आहे, असे भोसले यांनी सांगितले. तसेच पीएमआरडीए आणि पाटबंधारे विभाग या गावांना पाणी देण्यासाठी संयुक्त चर्चा करणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

निकषापेक्षा जास्त पाणी पुरवठा

शासनाच्या निकषाप्रमाणे पुणे शहरातील एक व्यक्तीस प्रतिदिन १५२ लिटर प्रती व्यक्ती पाणी देणे अपेक्षित आहे. पण पुण्यात २७० लिटर प्रति व्यक्ती प्रति दिन पाणी पुरविले जात आहे. सध्या असमान पाणी पुरवठा, गळती यामुळे हे प्रमाण जास्त दिसत असले तरी समान पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात पाणी बचत होऊन निकषाप्रमाणे पाणी पुरवठा करता येणे शक्य आहे, असे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com