मेट्रोच्या कामासाठी काढलेल्या 206 झाडांचे पुनर्रोपण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

झाडांचे केलेले पुनर्रोपण 
यशवंतराव चव्हाण गुलाबपुष्प उद्यान, भोसरी : 68 
(6 इंचापेक्षा कमी उंचीची झाडे) 
कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्र : 130 
(6 इंच ते 2 फुटापर्यंत उंची असलेली झाडे) 
संत तुकारामनगर परिसर : 8 
(1 फुटापासून पुढील उंचीची झाडे) 
झाडाच्या पुनर्रोपणाचा सरासरी खर्च (प्रति झाड) - 25 हजार

पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीज (दापोडी) ते खराळवाडी या सुमारे सव्वाआठ किलोमीटरच्या अंतरातील मेट्रोच्या कामात अडथळा ठरणारी 206 झाडे हटवून त्याचे शहरात विविध ठिकाणी पुनर्रोपण केले आहे. महामेट्रोतर्फे शहरात एकूण 4 हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. 

झाडांच्या केलेल्या पुनर्रोपणाची माहिती देण्यासाठी महामेट्रोतर्फे गुरुवारी पत्रकारांसाठी वृक्ष पाहणी दौरा आयोजित केला होता. त्या वेळी महामेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे, हॉर्टिकल्चर विभागाचे उपव्यवस्थापक बी.जी.माने यांनी ही माहिती दिली. हॅरिस ब्रीज ते खराळवाडी या अंतरात असलेल्या एकूण 419 झाडांपैकी आत्तापर्यंत 206 झाडांचे पुनर्रोपण केले आहे. आवश्‍यकतेनुसार आणि कामात अडथळा ठरत असल्यास उर्वरित झाडे काढली जातील. मात्र, त्यांचे पुन्हा पुनर्रोपण केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. झाडांच्या पुनर्रोपणाच्या कामासाठी 2 कोटी 30 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. 

कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्रात 28 एप्रिलपासून आत्तापर्यंत 78 झाडे लावली आहेत. तत्पूर्वी, येथे महामेट्रोतर्फे 52 झाडे लावण्यात आलेली होती. आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात नव्याने 1 हजार 500 झाडे लावण्याचे नियोजन आहे. 

झाडांचे केलेले पुनर्रोपण 
यशवंतराव चव्हाण गुलाबपुष्प उद्यान, भोसरी : 68 
(6 इंचापेक्षा कमी उंचीची झाडे) 
कासारवाडी मैलाशुद्धीकरण केंद्र : 130 
(6 इंच ते 2 फुटापर्यंत उंची असलेली झाडे) 
संत तुकारामनगर परिसर : 8 
(1 फुटापासून पुढील उंचीची झाडे) 
झाडाच्या पुनर्रोपणाचा सरासरी खर्च (प्रति झाड) - 25 हजार

Web Title: 206 trees transplanted in pune city