पुणे शहरात २६४ दिवसांत चिकुनगुणियाचे २०९ रुग्ण

पुणे शहरात २६३ दिवसांमध्ये २०९ रुग्णांना चिकुनगुणियाचे निदान झाले. यातील बहुतांश रुग्णांना त्यानंतर किमान दोन ते तीन महिने सांधे दुखीचा भयंकर त्रास सहन करावा लागला.
mosquito
mosquitoSakal

पुणे - शहरात २६३ दिवसांमध्ये २०९ रुग्णांना चिकुनगुणियाचे निदान झाले. यातील बहुतांश रुग्णांना त्यानंतर किमान दोन ते तीन महिने सांधे दुखीचा भयंकर त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आपल्या परिसरातील डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करा. कारण, स्वच्छ पाण्यावर झालेल्या डासांच्या पैदाशीमधूनच हा आजार वेगाने पसरतो आहे.

शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्याचप्रमाणे चिकुनगुणियाच्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य खात्याने नोंदविले. चिकुनगुणिया हा अरबो या प्रकारच्या विषाणूंच्या प्रादुर्भावाने होणारा आजार आहे. एडिस इजिप्ती या डासाच्या माध्यमातून या विषाणूंचा प्रसार होतो. या डासाची मादी चावल्याने हा विषाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. हा डास चावल्यानंतर तीन ते सात दिवसांमध्ये चिकुनगुणियाची लक्षणे दिसायला सुरवात होते. त्यात प्रामुख्याने ताप येणे, थंडी वाजणे, डोके दुखी, मळमळ, अंगावर पुरळ येणे अशा लक्षणांचा समावेश असतो.

यावर्षी कोरोनाचा उद्रेक झाला होता. यातील बहुतांश लक्षणे कोरोनाचीदेखिल आहेत. त्यामुळे सर्व प्रथम कोरोना निदानाची प्रयोगशाळा चाचणी करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत होते. त्या चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर टायफॉईड, डेंगी, चिकुनगुणिया या विषाणूजन्य आजारांची वैद्यकीय चाचणी करण्यात येई. यातून गेल्या १० महिन्यांमध्ये शहरात २०९ रुग्णांना चिकुनगुणियाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. यातील बहुतांश रुग्णांना चिकुनगुणिया बरा झाल्यानंतरही सांधे दुखीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कोपरे, खांदे, कंबर, गुडघे अशा सांध्यांमधून असह्य वेदना होतात.

mosquito
'फकिरा’ने गाठला साठ वर्षांत सव्वा लाख प्रतींचा टप्पा !

याबद्दल चिकुनगुणियाचा रुग्ण संतोष कांबळे म्हणाले, ‘‘एका जागेवरून पटकन उठता येत नाही. उभा असेल तर पटकन चालता येत नाही. प्रत्येक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे वेदनानाशक घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.’’

डॉ. सागर चव्हाण म्हणाले, ‘‘चिकुनगुणियावर विशिष्ट असा औषधोपचार उपलब्ध नाही. रुग्णाच्या लक्षणांवर आधारित उपचार करावा लागतो. औषधोपचार आणि विश्रांती यातून रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो.’’

हे करा...

  • घरातील पाणी साठविण्याची सर्व भांडी आठवड्यातून रिकामी करा

  • पाणी साठविण्याची सर्व भांडी योग्य पद्धतीने झाकून ठेवा.

  • घराच्या भोवतालचा परिसर स्वच्छता व कोरडा ठेवावा

  • निरुपयोगी व टाकाऊ वस्तू घराच्या छतावर आणि परिसरात ठेवू नका

  • शक्यतो पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com