विमानतळावर 22 लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

पुणे - दुबई येथून तस्करी करून आणलेली तब्बल 22 लाख रुपये किमतीची सहा सोन्याची बिस्किटे लोहगाव विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी जप्त केली. स्पाईसजेटच्या दुबईहून सकाळी आलेल्या विमानातून ही सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. 

दुबई येथून स्पाईसजेटचे विमान शनिवारी सकाळी विमानतळावर आले. त्या वेळी कस्टम अधिकाऱ्यांना या विमानाच्या ऑक्‍सिजन मास्क पॅनेलमध्ये सोन्याचे बिस्किट असल्याचे आढळून आले. तपासणीनंतर सहा सोन्याची बिस्किटे एका पिवळ्या रंगाच्या कापडात ठेवलेली होती. त्यांचे 699. 90 ग्राम इतके वजन असून किंमत 21 लाख 90 हजार 750 रुपये असल्याचे पुणे विमानतळावरील उपायुक्त महेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: 22 lakh gold biscuits seized at the pune airport