Pune News : २२ भूखंडांवरील झोपडपट्ट्यांचा होणार पुनर्विकास

पुणे शहरात तब्बल ४८६ झोपडपट्ट्या आहेत. त्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोक राहात आहेत.
Slum
Slumsakal

पुणे - पुणे शहरात खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा (एसआरए) विकास रखडलेला असताना आता पुणे महापालिकेने स्वतःच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या २२ भूखंडांवर झोपडपट्ट्या आहेत. पहिल्या टप्प्यात त्यातील एक ते दोन ठिकाणी ‘एसआरए’ राबविली जाणार आहे.

पुणे शहरात तब्बल ४८६ झोपडपट्ट्या आहेत. त्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोक राहात आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये कमी जागा, अस्वच्छता, स्वच्छतागृहांचा अभाव यामुळे नागरिकांचे जीवनमान कष्टाचे असते. शिवाय शहराचे बकालीकरणही वाढत असल्याने येथे राहणाऱ्या कष्टकऱ्यांना स्वतःचे हक्काचे पक्के घर असावे यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जाते. पुणे शहरात गेल्या २० वर्षांत फक्त ६७ योजना पूर्ण झाल्याने या योजनेचा म्हणावा तसा फायदा झालेला नाही.

पुणे महापालिकेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे २००४ मध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून नोंदणी केलेली आहे. पण स्वतः ‘एसआरए’ विकसित करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले नव्हते. शहरात महापालिकेच्या भूखंडावर २२ झोपडपट्ट्या आहेत, त्यात लाखो नागरिक राहत आहेत.

पुणे महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेतून वडगाव, हडपसर, खराडी येथे स्वतः २९१८ घरे बांधली आहेत. त्याचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले आहे. त्यामुळे पालिकेने या अनुभवाच्या जोरावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी आजच आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे अधिकाऱ्यांची बैठक झाली.

विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती

पुणे महापालिकेतून अधीक्षक अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले सुधीर कदम यांची या झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कामासाठी विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बांधकाम विभाग, मालमत्ता व्यवस्थापन विभाग यासह इतर विभागांच्या समन्वयातून हा प्रकल्प मार्गी लागेल.

क्षेत्रीय अधिकारी असणार ‘सक्षम’

ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये झोपडपट्टी आहे, त्या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त हे ‘एसआरए’चे सक्षम अधिकारी म्हणून काम पाहतील. या योजनेतील घरासाठी पात्र व अपात्र रहिवाशांची नावे अंतिम करण्याचा अधिकारी त्यांच्याकडे असणार आहे.

पुणे महापालिकेच्या मालकीच्या जागेवर झोपडपट्टी झाली आहे. त्या जागा महापालिका स्वतः विकसित करणार आहे. त्याची मंगळवारी प्राथमिक बैठक झाली आहे. जागेची मोजणी करणे, यातून किती क्षेत्र मोकळे होणार आहे. याचा अभ्यास केला जाणार आहे. यातून झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वतःचे चांगले घर देण्याचा प्रयत्न महापालिकेचा आहे.

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

या आहेत २२ झोपडपट्ट्या

  • कल्याणीनगर पूल झोपडपट्टी

  • यशवंतनगर, येरवडा

  • सुभाषनगर येरवडा

  • भारतनगर येरवडा

  • जिजामातानगर येरवडा

  • सादलबाबा दर्गा ते चिमा उद्यान, येरवडा

  • सागर कॉलनी कोथरूड

  • बर्निंग घाट, ढोले पाटील रस्ता

  • पॉप्युलर हाइट, बंड गार्डन

  • पांचाळ वस्ती, धनकवडी

  • पाटील वीटभट्टी, धनकवडी,

  • श्रमिक वस्ती, धनकवडी

  • रामनगर, रामटेकडी

  • लोहियानगर, भवानीपेठ

  • भावस्कर कार्यालय, घोरपडे पेठ

  • जोशी वस्ती घोरपडे पेठ

  • धोबीघाट, घोरपडे पेठ

  • जोशी समाज वस्ती गंज पेठ

  • ६३३, महात्मा फुले पेठ समता भूमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com